Advertisement

ड्रायव्हिंग लायसन्स 'या' तारखेपर्यंत स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरीत करा

ड्रायव्हिंग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम

ड्रायव्हिंग लायसन्स 'या' तारखेपर्यंत स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरीत करा
SHARES

ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हिंग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ज्या चालकांनी वैयक्तिकरित्या परवाना घेतला आहे अशा वाहनचालकांनी वाहन चालविण्याचा परवाना स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरित करून घ्यावा. यासाठी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत संगणकीय प्रणालीच्या मदतीने स्मार्ट कार्ड करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत काळसकर यांनी केले आहे.

15 सप्टेंबरनंतर मानवी स्वरुपातील नोंदी स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरित होणार नाहीत याची परवानाधारकांनी नोंद घ्यावी. ताडदेव, मुंबई (मध्य) येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) परिसरात कार्यालयीन इमारत, I&C केंद्र, चालक प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येणार आहे.

या कार्यालयाने नोव्हेंबर 2006 पूर्वी जारी केलेल्या सर्व परवानाधारकांकडे त्यांचा परवाना मानवी स्वरुपात आहे, अशा परवानाधारकांनी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत या कार्यालयात येऊन संगणक प्रणालीमध्ये परवाना बॅकलॉग करावा. 



हेही वाचा

गणेशोत्सवात कोकण मार्गावर अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सवात कोस्टल रोड 24 तास खुला ठेवण्याची पोलिसांची विनंती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा