Advertisement

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
SHARES

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडणार असून घाटमाथ्यावरही पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कमाल तापमानातही घट झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत होती. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाली आहे. यावेळी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून संध्याकाळी पाऊस पडेल.



हेही वाचा

लक्ष द्या! कल्याण-डोंबिवलीत 15 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा