Advertisement

अखेर तळीरामांची चिंता मिटली, 'या' भागातील वाईन शाॅप सुरू होणार


अखेर तळीरामांची चिंता मिटली, 'या' भागातील वाईन शाॅप सुरू होणार
SHARES
लाँकडाऊनमुळे गेल्या 40 दिवसांपासून घसा कोरडा असलेल्या तळीरामांचा घसा आता ओला होईल असे दिसत आहे. केंद्र सरकारने 4 मे नंतर देशाच्या ठरावीक भागांमधील दारुच्या दुकानांना उघडण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तसे आदेशच राज्यसरकारला पाठवल्याचे सांगितले जात आहे. त्याच बरोबर त्या परिसरातील पान मसाल्याची दुकाने ही उघडी ठेवण्यात परवानगी देण्यात आल्याचे कळते.

मुंबईसह राज्यभरात 9 मार्चपासून कोरोना या महामारीमुळे लाँकडाऊन ठेवण्यात आल्यामुळे शहरातील हाँटेल, बार, वाईन्स शाँप आणि पान टपऱ्या बंद होत्या. त्यामुळे तळीरांसह नशा करणाऱ्यांचे चांगलेच वांदे झाले होते. काहींनी तर परिस्थितीचा फायदा घेऊन दारू, सिगारेट आणि तंबाखूच्या पुड्यांचा काळाबाजार करण्यास सुरूवात केली. दारूच्या एका बाटलीसाठी तळीरामांना तिप्पट पैसे मोजावे लागत होते. तर 170 रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या सिगारेटच्या पाकीटांसाठी 250 ते 300 रुपये मोजावे लागत होते. तर गुटखा आणि तंबाखूच्या पुड्यांची किंमत दुप्पट होती. त्यामुळे नशेखोरांचे चांगलेच वांदे झाले होते. त्यात लाँकडाऊन आता 17 मे पर्यंत वाढवण्यात आल्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

माञ लाँक डाऊन जरी वाढवला असला. तरी काही सुरक्षित भागातील म्हणजेच ग्रीन झोन मधील वाईन शाँप, पान टपऱ्या सुरू करण्यास आता केंद्रीय गृहविभागाने परवानगी दिल्याचे कळते.माञ ज्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. जे झोन धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अशा प्रभागात या विक्रीवर बंदी कायम ठेवल्याचे कळते. तसेच ज्या ठिकाणी ही नशेची दुकान उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहेत. त्या ठिकाणी काही अटी ही टाकण्यात आल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने म्हणजे दुकानाबाहेर सहा पेक्षा जास्त व्यक्तींची गर्दी नसावी. प्रत्येक व्यक्तीमध्ये सहा फूटाचे अंतर असावे असे सांगण्यात आले आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा