राज्यातील गरीब, गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेंतर्गत ८४८ केंद्रांच्या माध्यमातून १ कोटी ८७० थाळ्यांचं वितरण (maharashtra government distribute 1 crore shiv bhojan thali till date says cm uddhav thackeray) करण्यात आलं असून या योजनेचा सर्वसामान्य नागरिक, स्थलांतरित मजूर-कामगारांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्यात १ जून ते २९ जून पर्यंत ८५४ शिवभोजन केंद्रातून ५ रूपये प्रति थाळी याप्रमाणे २९ लाख ९१ हजार ७५५ शिवभोजन थाळ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. तसंच एप्रिल ते जून या कालावधीत ८७ लाख ७५ हजार ५३२ शिवभोजन थाळ्या वाटप झाल्या आहेत.
त्याचसोबत राज्यातील ५२ हजार ४३७ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचं वितरण सुरळीत सुरु आहे १ जून ते २९ जून पर्यंत राज्यातील १ कोटी ४६ लाख २९ हजार ९२० शिधापत्रिका धारकांना ६५ लाख ७३ हजार १२० क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं तसंच २९ लाख ९१ हजार ७५५ शिवभोजन थाळ्यांचं वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
हेही वाचा - सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णय
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४३७ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १९ लाख ९७ हजार ५५० क्विंटल गहू, १५ लाख ३० हजार ३०२ क्विंटल तांदूळ, तर २१ हजार १६८ क्विंटल साखरेचं वाटप करण्यात आलं आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ३ लाख ६४ हजार ४२८ शिधापत्रिकाधारकांनी ते जिथं राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतलं आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. १ जूनपासून एकूण १ कोटी ११ लाख ५३ हजार ६२ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केलं आहे. या रेशनकार्ड वरील ५ कोटी ५ लाख ५ हजार १९३ लोकसंख्येला २५ लाख २५ हजार २६० क्विंटल तांदळाचं वाटप झालं आहे.