कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेतला होता. पण, या निर्णयाच्या काही तासानंतर राज्य सरकारकडून (State Government) एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.
त्यात राज्यातील निर्बंध (Unlock) अद्याप हटवले नसल्याचं म्हटलं आहे. तसंच, नव्या नियमांचा प्रस्ताप अजून विचाराधीन असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पत्रकार परिषद घेत अनलॉक(Unlock)चे पाच टप्पे जाहीर केले. मात्र आता तासाभरातच ठाकरे सरकारनं आपल्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे.
या संदर्भात आता राज्य सरकारनं स्पष्टीकरण देत म्हटलं की, राज्यातील निर्बंध हटवण्यात आले नाहीत. कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल.
राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरवण्यात येत आहेत. यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता वरून हे निकष ठरवण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.
हेही वाचा