Advertisement

महाराष्ट्रात सहा महीन्यात 1,267 शेतकऱ्यांची आत्महत्या

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार 2022 मध्ये देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी 37.6 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

महाराष्ट्रात सहा महीन्यात 1,267 शेतकऱ्यांची आत्महत्या
SHARES

2023-24 वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्रात (maharashtra) एकूण 1,267 शेतकऱ्यांनी आत्महत्या (suicide) केल्या आहेत. राज्याच्या विदर्भातील अमरावती (amravati) विभागात तब्बल 557 मृत्यू झाले आहेत.

जानेवारी ते जून महिन्या पर्यंतच्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभाग शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बाबतीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे 430 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर नाशिक (nashik) विभागात 137, नागपूर (nagpur) विभागात 130 आणि पुणे (pune) विभागात 13 मृत्यू आहेत. तसेच कोकण (kokan) किनारपट्टी विभागात एकही मृत्यू झालेला नाही.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार 2022 मध्ये देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी 37.6 टक्क्यांसह महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.

एनसीआरबीने म्हटले आहे की 5,207 शेतकरी (farmers) किंवा शेती करणारे आणि 6,083 शेतमजूर असलेल्या 11,290 व्यक्तींनी 2022 मध्ये आपले जीवन संपवले. हे प्रमाण देशातील एकूण आत्महत्यांपैकी 6.6 टक्के म्हणजे 1,70,924 इतकेआहे.



हेही वाचा

मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येविरोधात हटके आंदोलन

उद्धव ठाकरे राबवणार शिवसंपर्क अभियान

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा