डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीला शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. दरम्यान आग भीषण असली तरी सुदवैनं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आगीचं वृत्त समजताच अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
शनिवारी सकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीला आग लागण्याची घटना घडली. यानंतर त्यानंतर अग्नीशमन दलाच्या आठ गाड्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. मानपाडा पोलिस स्थानकानजीक हा कारखाना असल्यामुळे मानपाडा पोलिसांनी अग्नीशमन दलाला याबाबत माहिती दिली. तब्बल दोन तास अग्नीशमन दलाच्या जवावानांनी ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा -
ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ओव्हरहेट वायर तुटल्यानं ठप्प
जेटच्या प्रवाशांसाठी एअर इंडियाची खास सवलत