Advertisement

महापालिका अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक रद्द


महापालिका अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक रद्द
SHARES

मुंबई महापालिकेच्या स्थापत्य उपनगरे समितीची बैठक बुधवारी अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने तहकूब करण्यात आली. मुंबईत पावसामुळे कचरा, रस्त्यांवरील खड्डे, ठिकठिकाणी तुंबणारे पाणी आदी समस्या निर्माण होत असून नगरसेवकांना यासाठी वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. परंतु याचा जाब विचारायला अधिकारीच न आल्याने स्थापत्य उपनगरे समितीच्या अध्यक्षा साधना माने यांनी कोणत्याही प्रकारचं कामकाज न करता सभाच तहकूब करून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला.


नेमकं काय झालं?

स्थापत्य उपनगरे समितीची बैठक बुधवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबईत पावसामुळे तुंबणारं पाणी, निर्माण झालेला कचरा, खड्डयांचं प्रमाण, त्यासाठी लागणारं मटेरिय आदी प्रश्नांबाबत नगरसेवकांना जाब विचाराय होता. परंतु या सभेला खात्याचा एकही प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हता. ही बाब शिवसेनेचे नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ही बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याला शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर,श्रीकांत शेट्ये,उपेंद्र सावंत, दिपमाला बढे, भाजपाच्या आशा मराठे, हर्ष पटेल, दिपक ठाकूर, विनोद मिश्रा यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर ही सभाच तहकूब करण्यात आली.



हेही वाचा-

खड्डयांमुळे बुरखा घालून बाहेर पडण्याची वेळ, नगरसेवकांनी मांडली कैफियत

निकृष्ट कोल्डमिक्स महापालिकेचं की कंत्राटदाराचं?



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा