Advertisement

मरीन ड्राइव्ह परिसरात महिलांसाठी 'ती' स्वच्छतागृह

महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न लक्षात घेत मुंबई महापालिकेनं महिलांसाठी 'ती' स्वच्छतागृह सुरू केलं आहे.

मरीन ड्राइव्ह परिसरात महिलांसाठी 'ती' स्वच्छतागृह
SHARES

महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न लक्षात घेत मुंबई महापालिकेनं महिलांसाठी 'तीस्वच्छतागृह सुरू केलं आहे. मुंबईतील मरीन ड्रइव्ह रेल्वे स्थानकाजवळ सुरू करण्यात आलं असून, एका जुन्या बसचं रुपांतर टॉयलेटमध्ये केलं आहे. 'ती' स्वच्छतागृहात वायफाय आणि टिव्हीसारख्या सुविधा आहेत. तसंच, पुण्याच्या धर्तीवर महापालिकेनं ही सुविधा सुरू केली आहे. 

पहिलं 'तीटॉयलेट

मुंबईतील हे पहिलं 'ती' टॉयलेट आहे. या बसमध्ये वायफाय असलेल्या टीव्ही स्क्रीन्ससह एक डिजीटल फीडबॅक मशीन आहे. पॅनिक बटण, सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्सर, सोलार लाइट्स, ब्रेस्टफिडींग स्टेशन अशा अनेक सुविधा महिलांना या 'ती' टॉयलेटमध्ये मिळणार आहेतपुण्याची 'ती' टॉयलेट बनवणारी कंपनी सारा प्लास्ट इंडिया लिमिटेडशी महापालिकेनं ९ सप्टेंबर रोजी संपर्क साधला. पालिकेने काही अटीही ठेवल्या होत्या.

प्रति महिला ५ रुशुल्क 

यामध्ये या टॉयलेटची जागा, पाणी, वीजेची व्यवस्था पालिका करेल, एक वर्षापर्यंत या टॉयलेटचा खर्च पालिका उचलणार आहे. ड्रेनेज लाईनही पालिकेची असणार आहे. या टॉयलेटला पे अँड यूज मॉडेलप्रमाणं चालवलं जावं आणि प्रति महिला ५ रु. शुल्क आकारलं जावं याची परवानगी पालिका देणार आहेत्याशिवाय, अन्य अटींमध्ये महसूलविषयक अटीचा समावेश आहे. टॉयलेटमध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं उपयोगी असलेली उत्पादनं, पॅकेज प्रोडक्ट विकणं, टॉयलेटबाहेर बसवर जाहिरात करणं आदीतून मिळणाऱ्या महसूलापैकी ९० टक्के कंपनी आणि १० टक्के पालिका घेणार आहे.

Advertisement

मरीन ड्राइव्हपासून सुरूवात

या स्वच्छतागृहाची सुरुवात मरीन ड्राइव्हपासून करण्यात येणार आहे. तसंच, भविष्यात मुंबईत अनेक ठिकाणी अशी स्वच्छतागृहं सुरू करण्यात येणार आहेत. मरीन ड्राइव्हचा परिसर हेरिटेजमध्ये मोडत असल्यानं ते पक्क्या टॉयलेटच्या बांधकामासाठी हेरिटेज समितीची परवानगी लागणार असून,  इथं येणाऱ्या महिला पर्यटक तसंच प्रवाशांची संख्याही मोठी असल्यानं या परिसरात सुरू करण्यात आलं आहे. 



हेही वाचा -

दक्षिण मुंबईतील 'या' भागात बुधवार, गुरूवारी पाणीकपात

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शहांच्या वक्तव्यामुळं शिवसेना दबावात..?


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा