मुंबईच्या (mumbai) पावसाळ्याच्या पुनरागमनामुळे मस्जिद बंदर स्टेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) यांना जोडणाऱ्या ऐतिहासिक कार्नक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी विलंब झाला आहे.
याचे कारण म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेला (bmc) 550 मेट्रिक टन वजनाचा महत्त्वपूर्ण गर्डर बसवण्यासाठी रेल्वेने सहा तासांचा मेगाब्लॉक नाकारला आहे.
गेल्या महिन्यात, प्रशासनाने रेल्वे ट्रॅकच्या पूर्वेकडील बीम जोडणी पूर्ण केली आणि नवीन गर्डर विभाग मुंबईला पोहोचवले आहेत. सूत्रांनुसार, पुलाचा एक गर्डर बसवण्यासाठी तयार आहे आणि मार्च 2025 पर्यंत दोन्ही गर्डर बसण्याची अपेक्षा आहे.
मात्र, मेगाब्लॉक नाकारल्याने रेल्वे रुळांवर गर्डर बसवण्याचे काम रखडले आहे. गर्डर 70 मीटर लांब आणि 9.5 मीटर रुंद आहे. सूत्रांच्या म्हण्ण्यानुसार महापालिकेने रेल्वेला अनेक विनंत्या केल्या आहेत आणि त्यांना शक्य तितक्या लवकर आवश्यक मेगाब्लॉक (mega block) ठेवण्यास सांगितले आहे.
रेल्वेने मेगाब्लॉक देण्यास नकार दिला आहे. कारण पावसाळ्यात रेल्वे अधिकाऱ्यांना सुरक्षेची चिंता असते. परिणामी, पावसाळा संपेपर्यंत पूलाचे बांधकाम होणार नाही.
पहिल्या गर्डरचे काम केल्यानंतर, दुसऱ्या गर्डरच्या कामासाठी दुसरा मेगाब्लॉक आवश्यक असेल. या बांधकाम प्रक्रियेत मोठे गर्डर्स उचलणे आणि बसवणे समाविष्ट आहे.
नवीन पूल कार्यान्वित होण्यासाठी किमान 1.5 वर्षे लागतील. सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास 150 वर्ष जुना कार्नॅक पूल बंद करण्यात आला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये हा पूल पाडण्यात आला आणि 2023 मध्ये बांधकाम सुरू झाले.
हेही वाचा