Advertisement

30 ऑगस्टला एच पश्चिम विभागात पाणीकपात

बीएमसीने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

30 ऑगस्टला एच पश्चिम विभागात पाणीकपात
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) प्रशासनाने मुंबई (mumbai) महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय 1 च्या जुन्या झालेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, वांद्रे पश्चिम येथील आर.के. पाटकर मार्गावरील रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक 32 दरम्यान नव्या जलवाहिनी सुरु होणार आहे.

संबंधित काम शुक्रवार, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे एच पश्चिम विभाग कार्यालय हद्दीतील काही भागांचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

मुंबई महापालिकेने (brihanmumbai municipal corporation) एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी कामे हाती घेतली आहेत. याअंतर्गत जुन्या जलवाहिन्या काढून त्याजागी नव्या जलवाहिन्या सुरू करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामानंतर पाली हिल जलाशयाची पातळी सुधारेल. एकूणच, एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल.

दरम्यान, या दुरुस्तीच्या कामामुळे आजूबाजूच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, खार दांडा आदी भागात पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

Advertisement

तसेच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर ठराविक अंतराने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 4 ते 5 दिवस पाणी फिल्टर करून उकळून प्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

'या' भागातील पाणीपुरवठा बंद

वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्साल्विस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेर्ली राजन मार्ग (सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील)

खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुईम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबंद झोपडपट्टीचा काही भाग (पाणीपुरवठा संध्याकाळी 5.30 ते 8.30 दरम्यान बंद राहील)

Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगतचे भाग, पळस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिमेचा काही भाग (रात्री 9 ते 12 दरम्यान पाणीपुरवठा बंद राहील)



हेही वाचा

सिडकोतर्फे 902 घरांच्या विक्रीसाठी गृहनिर्माण योजना

नवी मुंबई : बामणडोंगरी गृहनिर्माण संकुलात खरेदी करा स्वतःचे दुकान

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा