Advertisement

पनवेल एक्झीट मार्ग 6 महिने बंद

Mumbai-Pune प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्ग काय? हे जाणून घ्या...

पनवेल एक्झीट मार्ग 6 महिने बंद
SHARES

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल इथला मुंबईला जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली मार्ग बंद करण्यात आला आहे. कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहील. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्याचे काम हाती घेत आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने उडड्राणपुल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होणयाची शक्यता आहे. 

वाहतूककोंडी टाळण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट हा मार्ग 11 फेब्रुवारीपासून पुढील 6 महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  

त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झीट येथून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या (हलकी व जड अवजड वाहने) वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पनवेल एक्झीट हा मार्ग पुढील 6 महिने बंद राहील. 

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग?

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा (कि.मी. 9.600) येथे डावीकडे वळण घेवून एनएच 48 मार्गावरून पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जाता येणार आहे.

तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून (पनेवल एक्झीट) येथून तळोजा, कल्याण- शिळफाटयाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल सायन महामार्गावरून पुरूषार्थ पेट्रोलपंप उडड्राणपुलाखालून उजवीकडे वळण घेवून रोडपाली येथून एन.एच 48 महामार्गावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.



हेही वाचा

बाणगंगा तलाव परिसर अतिक्रमणमुक्त

एमएमआरच्या आर्थिक विकास योजनेला चालना

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा