Advertisement

मुंबई: आरे पोलिसांची 11 अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी

आरे रोडवर पूर्वी स्पीड ब्रेकर आणि इशारा देणारे फलक होते परंतु रस्त्याच्या काँक्रीटीकरणादरम्यान ते काढून टाकण्यात आले.

मुंबई: आरे पोलिसांची 11 अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी
SHARES

आरे (aarey) पोलिसांनी वाहतूक विभागाला आरे मिल्क कॉलनी रोडवरील 11 अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकर (speed breakers)बसवण्यास सांगितले आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी मुख्य आरे रस्त्यावर स्पीड ब्रेकर आणि रम्बलर बसवण्याची शिफारस केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव ते पवई आणि मरोळ या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण झाल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वेग वाढला आहे.

पोलिसांनी पिकनिक पॉइंट आणि युनिट 5 येथे ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची सूचना देखील केली आहे. या मार्गावरील हे दोन सर्वात वर्दळीचे चौक आहेत. रस्त्यांच्या कमतरतेमुळे पादचाऱ्यांसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.

अहवालांनुसार, गेल्या वर्षी या मार्गावर अपघातात किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. आरे रोडवर पूर्वी स्पीड ब्रेकर आणि इशारा (speed limit) देणारे फलक होते परंतु रस्त्याच्या काँक्रीटीकरणादरम्यान ते काढून टाकण्यात आले. स्थानिकांचे म्हणणे आहे की, नवीन काँक्रीट रस्त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

आरे रस्त्यावरून दररोज 25,000 हून अधिक वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता पवई आणि मरोळला गोरेगावमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडतो. रात्रीच्या वेळी बेदरकारपणे गाडी चालवल्याने वन्यजीव आणि पादचाऱ्यांना धोका (accident) निर्माण होतो.

रहिवाशांनी पोलिस आणि वन विभागाला गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. त्यांनी वेगवान वाहनचालकांवर कडक दंड करण्याची मागणीही केली आहे.

8 फेब्रुवारी रोजी घडलेल्या एका घटनेत या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला होता, जिथे आरे मिल्क कॉलनीजवळ बसने दुचाकीला धडक दिल्याने 20 वर्षांच्या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला.

स्पीड ब्रेकरसाठी प्रस्तावित प्रमुख ठिकाणांमध्ये संक्रमन स्टुडिओ, छोटा काश्मीर तलाव, युनिट 6, मॉडर्न बेकरी आणि आरे हॉस्पिटल जंक्शनमधील परिसर आणि युनिट 19 यांचा समावेश आहे.



हेही वाचा

मुंबईतील घरांसाठी गिरणी कामगारांचा मोर्चा

मुंबईत लवकरच बॅटरीवर चालणारे मालवाहू जहाज बांधले जाणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा