Advertisement

गणपतीला गावी जाणाऱ्यांसाठी खूश खबर...

मुंबई पोलिसांनी चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेऊन मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असलेल्यांना गणेशोत्सवासाठी ईपास देण्यास सुरूवात केली आहे.

गणपतीला गावी जाणाऱ्यांसाठी खूश खबर...
SHARES

कोकणात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र यंदा कोकणात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या सणावर विघ्न आले होते. मात्र नेहमीप्रमाणे चाकरमान्यांसाठी विघ्नहर्ता धावून आला आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांनी ई-पास देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आपल्या गावी निर्विघ्न जाता येणार आहे.

हेही वाचाः-मुंबई- सावंतवाडी स्पेशल ट्रेन मंगळवारपासून सेवेत

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याअंतर्गत किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून मिळालेला ई-पास असणे आवश्यक होते. ई पास शिवाय एका जिल्हातून दुस-या जिल्ह्यातही प्रवास करण्यावर बंदी आहे. एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात विनाकारण प्रवास करणे त्यामुळे शक्य नाही. त्यामुळे गणपतीसाठी गावी जाऊ पाहणाऱ्या चाकरमान्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित राहिला होता. यंदाचा गणेशोत्सव साधे पणात साजरा करण्याची प्रत्येकाची तयारी आहे. मात्र त्यासाठी गावे जाणेही तितकेच महत्वाचे, यंदाचा उत्सव चुकतोय की काय असे वाटत असतानाच, मुंबई पोलिसांनी चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेऊन मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असलेल्यांना गणेशोत्सवासाठी ईपास देण्यास सुरूवात केली आहे.  पोलिसानी ई-पास काढण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. अत्यावश्यक सेवा, नातेवाईकांच्या मृत्यूसंबधी प्रवास, वैद्यकीय कारण किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी परवानगी मिळत आहे.

हेही वाचाः- महापालिकेचे आवाहन ! गणपती विसर्जनासाठी चौपाट्यांवर करा आॅनलाईन बुकिंग

आता यामध्ये गणेशोत्सवाचा पर्यायही सामील करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणा-या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होतील. तसेच त्यामुळे होणा-या पासेसच्या काळाबाजारालाही रोख लावणे शक्य होणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले. स्थानिक उपायुक्तांना याचे अधिकार देण्यात आले असून विनाकारण पास देण्यात दिरंगाई न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यात पूर्णपणे पारदर्शकता आवश्यक असून पहिला अर्जाला प्रथम प्राधान्य असे आदेश पोलिस अधिका-यांना देण्यात आले आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. राज्य सरकारने याबाबत रेल्वे खात्याला पत्र लिहिले आहे. प्रवाशांनी केलेल्या तिकीट बुकिंगनुसार गाड्या सोडल्या जाणार आहेत

कुठे आणि कसा मिळवाल पास

मुंबई पोलिसांनी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या https://covid19.mhpolice.in/ या साईटवर क्लिक करून तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुमाला ईपास मिळेल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा