Advertisement

पावसाळ्यात रेल्वे रुळावर साचणार नाही पाणी, रेल्वेची नवी संकल्पना

पाणी साचू नये यासाठी पश्चिम रेल्वे सुधारित तंत्राचा वापर करणार आहे.

पावसाळ्यात रेल्वे रुळावर साचणार नाही पाणी, रेल्वेची नवी संकल्पना
SHARES

पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचू नये यासाठी पश्चिम रेल्वेने यंदा मायक्रोटनेलिंग पद्धतीने सात पर्जन्य वाहिन्या तयार केल्या आहेत. तसेच, पाणी उपसण्यासाठी पंपाची व्यवस्था, रेल्वे ट्रॅकची साफसफाई केली आहे.

अतिवृष्टीदरम्यान गटारांची सतत तपासणी करण्यासाठी 'रिमोट कंट्रोल्ड व्हिज्युअल फ्लोट कॅमेरे' तयार करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा भुयारी मार्गात प्रवेश करू शकत नाहीत, अशा ठिकाणी रिमोट कंट्रोल व्हिज्युअल फ्लोट कॅमेरे वापरण्यात येतील.

अतिवृष्टी झाल्यास पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे या ठिकाणी भुयारी गटार आणि नाल्यांची कामे गतीने झाली आहेत.

पावसाळ्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना गटारात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे भुयारी मार्गांची तपासणी करण्यासाठी रिमोट कंट्रोल व्हिज्युअल फ्लोट कॅमेरे वापरण्यात येणार आहेत. हा कॅमेरा छोट्या बोटीतून भुयारी मार्गातील प्रत्येक बाबीची अद्ययावत माहिती संकलित करून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना देईल. रेल्वे अधिकारी हा कॅमेरा रिमोट कंट्रोलने नियंत्रित करू शकतात आणि आवश्यक त्या ठिकाणी हलवू शकतात. तसेच, भुयारी गटारांमध्ये काही अडचण असल्यास, पाण्याच्या प्रवाहात अडथळा असल्याचे आढळून आल्यास पुढील उपाययोजना करण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पश्चिम रेल्वेकडे सध्या 30 'रिमोट कंट्रोल्ड व्हिज्युअल फ्लोट कॅमेरे' आहेत. या कॅमेऱ्यांची किंमत 3 लाख आहे. हे कॅमेरे कोणत्याही निश्चित ठिकाणी लावलेले नाहीत. त्यामुळे ते कधीही कुठेही वापरले जाऊ शकतात.



हेही वाचा

मुंबई, ठाणे, नाशिककरांचे पाणी महागणार?

नालेसफाईबाबत महापालिकेने केलेल्या दाव्याची काँग्रेसकडून पोलखोल

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा