मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीनुसार, दिवाळी सणापूर्वी, एकाच दिवशी 650 हून अधिक नवीन वाहनांची नोंदणी (registration) झाली आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा खरेदीचा आकडा दिवाळी सणामुळे वाढला आहे. दिवाळी सणादरम्यान अनेक कुटुंबे नवीन वाहने खरेदी करण्याचा विचार करतात. त्यामुळे दिवाळी सण आणि त्यातल्या त्यात धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तसेच, 29 ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहरातील आरटीओने (RTO) कार, दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांसह (vehicles) सुमारे 652 नवीन वाहनांची नोंदणी केली, असे अहवालात म्हटले आहे. तसेच दिवाळीच्या येत्या काही दिवसातही वाहन खरेदीचा आकडा आणखीन वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आरटीओच्या आकडेवारीनुसार, बोरिवली आरटीओमध्ये 115 वाहने, मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये 93 वाहने, मुंबई पूर्व आरटीओमध्ये 180 वाहने, मुंबई पश्चिम आरटीओमध्ये 201 वाहने आणि मुंबई पश्चिम आरटीओमध्ये अतिरिक्त 63 वाहनांची नोंदणी करण्यात आली.
हेही वाचा