ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी, नानावटी मॅक्स हॉस्पिटल 'पिंक स्पीडब्रेकर मोहीम' राबवत आहे. ‘Some Bumps Can Slow Down Life’, असा मेसेज याद्वारे देण्यात येणार आहे. नानावटी मॅक्स हॉस्पीटल ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता महिन्याचा भाग आहे.
जुहू, विलेपार्ले-सांताक्रूझ आणि वांद्रे यांसारख्या प्रमुख भागातील स्पीडब्रेकर गुलाबी रंगात रंगवलेले आहेत. यावर मेसेज लिहून ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरूकता पसरवणार आहे.
रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, हा उपक्रम लोकांना त्यांच्या व्यस्त जीवनातही आरोग्य तपासणीला प्राधान्य देण्याची आठवण करून देतो. हे स्तनाच्या कर्करोगापासून गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी लवकर ओळखण्याचे महत्त्व अधोरेखित करते. फोर्टमधील प्रतिष्ठित एशियाटिक लायब्ररी देखील पिंक रंगात प्रकाशित केली जात आहे.
दरम्यान, मुंबईतील पिंक स्पीडब्रेकर मोहीम 26 ऑक्टोबर रोजी ‘पिंक वॉक’ करणार आहे. यामध्ये 100 हून अधिक समुदाय सदस्य पिंक टी-शर्ट घालतील आणि ब्रेस्ट कॅन्सरमधून वाचलेल्याद्वारे मेसेज ही देण्यात येईल. पिंक फुगे सोडून कार्यक्रमाचा समारोप होईल.
नानावटी मॅक्स हॉस्पिटलमधील ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि ऑन्कोप्लास्टिक सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. गरवीत चितकारा म्हणाले, “स्तन कर्करोग हा जगभरातील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. यासारख्या उपक्रमांद्वारे नियमित स्क्रीनिंग आणि लवकर तपासणी करणे याविषयी जागरुकता पसरवतात."
हेही वाचा