Advertisement

मुंबईचा 'वी अनबिटेबल' अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये सर्वोत्तम

वसई-भार्इंदरमधील डान्सरनी (Dancer) परदेशी आपल्या कलेचं बक्षिस मिळवलं आहे.

मुंबईचा 'वी अनबिटेबल' अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये सर्वोत्तम
SHARES

वसई-भार्इंदरमधील डान्सरनी (Dancer) परदेशी आपल्या कलेचं बक्षिस मिळवलं आहे. जागतिक कलागुणांची दखल घेणाऱ्या व त्यांचा गौरव करणाऱ्या अमेरिकाज गॉट टॅलेंट (Americas Got Talents) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये वसई-भार्इंदरमधील (Vasai-Bhayandar) ‘वी अनबिटेबल (We unbeatable) या डान्स ग्रुपनं पहिला क्रमांक पटकाविला आहे. ही स्पर्धा अमेरिकेमध्ये सोमवारी पार पडली. राम-लीला या हिंदी चित्रपटात अभिनेता रणवीरसिंग (Ranveer singh) याच्यावर चित्रीत झालेल्या भन्नाट गाण्यावर नृत्य सादर केलं.

या यशाबद्दल वी अनबिटेबल नृत्य पथकातील (Dancers) कलाकारांचं सायमन कोवेल, हैदी क्लूम, आलेशा डिक्सन, होवी मंडेल या परीक्षकांनी व प्रेक्षकांनी उभे राहून अभिनंदन केलं. ट्रॅव्हिस बेकर याच्या ड्रमवादनानेही वातावरणात रंगत आणली. या रिअ‍ॅलिटी शोमध्ये कॅनडा, जर्मनी, अमेरिका आदी ४० देशांचे संघ सहभागी झाले होते.

सादरीकरणानं प्रभावित झालेले परीक्षक होवी मंडेल यांनी 'डान्सरनी रंगमंचावर प्रवेश केला, त्या क्षणापासूनच ते काहीतरी वेगळे करून दाखविणार असं वाटले होतं आणि तसंच झालं’, असं म्हटलं आहे.

‘वी अनबिटेबल’ (We unbeatable) या वसई-भार्इंदरमधील नृत्यपथकामध्ये २९ जणांचा समावेश होता. या नृत्यपथकाचं मूळ नाव अनबिटेबल (unbeatable) असं होतं. मात्र, त्यांचा विकास (Vikas) नावाचा सहकारी नृत्याच्या सरावाच्या वेळी मरण पावल्यानंतर नृत्यपथकाचं वी अनबिटेबल असं नामांतर करण्यात आलं. प्रत्येक कलाकाराच्या शर्टमागे विकास हे नाव लिहिलेलं असतं. यातील सर्व लहान मुलं व युवक गरीब व निम्नमध्यम वर्गातील आहेत.



हेही वाचा -

'लष्कर ए तोयबा'कडून मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल उडवून देण्याची धमकी

सरकत्या जिन्यांकडे रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा