Advertisement

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाण्यात 'नाम' भरवणार धान्य महोत्सव


शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाण्यात 'नाम' भरवणार धान्य महोत्सव
SHARES

राज्यातील शेतकरी हवालदील असताना दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळावा यासाठी नाम फाऊंडेशन ठाण्यात शेतकऱ्यांसाठी धान्य महोत्सव भरवणार आहे. बळीराजाला मदत व्हावी यासाठी ठाण्यात दोन ठिकाणी नाम फाऊंडेशन आणि कोकणविकास प्रतिष्ठान आयोजित आंबा मोहोत्सवासोबत धान्य महोत्सव सुरू करणार आहे.हा महोत्सव 1 मे ते 4 मेपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवाला मिळालेल्या यशानंतर राज्यभर हा उपक्रम घेणार असल्याची माहिती नाम फाऊंडेशनचे संस्थापक आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिली. तसेच या धान्य महोत्सवात मराठवाड्यातील जवळपास 400 शेतकरी सहभाग घेणार आहेत. तुरीचा प्रश्न राज्य सरकारने सोडवला पाहिजे अशी मागणी देखील या वेळी मकरंद अनासपुरे यांनी केली आहे. हुंडा मागणारे नामर्द आहे. आपण हुंडा घेतला नाही. हुंडा ही समाजाला लागलेली कीड आहे. लक्ष्मी आणताना देखील पैसे मागतात. या पिढीने हुंडा घेऊ नये असं आवाहन यावेळी मकरंद अनासपुरे यांनी केलं. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव, नाम फाऊंडेशन आणि संस्कार संस्था आयोजित धान्य महोत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा