Advertisement

"नेस्कोच्या परिसरात कुत्र्यांना खायला खालण्याचे आदेश नाही तर सल्ला"

नेस्कोने स्पष्ट केले की, ही एक सूचना आहे ज्यानुसार फीडिंग क्षेत्रे व्यावसायिक आस्थापनांमध्ये नाही तर निवासी सोसायट्या किंवा कॉम्प्लेक्समध्ये निश्चित केली जावीत.

"नेस्कोच्या परिसरात कुत्र्यांना खायला खालण्याचे आदेश नाही तर सल्ला"
SHARES

मुंबई (mumbai) महापालिकेने गोरेगावमधील (goregaon) नेस्को केंद्रामध्ये कुत्र्यांना खायला घालण्यासाठी न्यायालयाने आदेश दिला होता. पण न्यायालयाने आदेश नाही तर सल्ला दिला होता, असे नेस्को तर्फे सांगण्यात आलं आहे. 

नेस्कोने (NESCO) आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नेस्को लिमिटेडच्या मालकीच्या "खाजगी मालमत्तेचा" उल्लेख करणारे कोणतेही अधिकृत निर्देश जारी केलेले नाहीत. 

नेस्कोने स्पष्ट केले की, ही एक सूचना आहे ज्यानुसार फीडिंग क्षेत्रे व्यावसायिक आस्थापनांमध्ये नाही तर निवासी सोसायट्या किंवा कॉम्प्लेक्समध्ये निश्चित केली जावीत. तथापि, महापालिकेने सांगितले की, या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निवासी सोसायट्या, व्यापारी संकुले आणि औद्योगिक झोन यासह सर्व भागात कुत्र्यांना खायला घालण्यासाठी फीडिंग क्षेत्र उभारण्याची परवानगी आहे.

10 ऑक्टोबर रोजी, महापालिकेतील पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या सहाय्यक महाव्यवस्थापकांनी नेस्को पार्कचे अध्यक्ष/सचिव यांना पत्र लिहिले. त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, पालिकेला पाल वेल्फेअर फाऊंडेशनकडून तक्रार प्राप्त झाली होती. ज्यामध्ये सुरक्षा कर्मचारी आणि कर्मचारी भटक्या कुत्र्यांना खाण्यास मनाई करत होते. तसेच त्यांना खायला देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्रास देत होते.

नेस्कोच्या म्हणण्यानुसार

मिड-डेच्या 18 ऑक्टोबरच्या 'नेस्को परिसरात भटक्या कुत्र्यांसाठी (stray dogs) फीडिंग झोन स्थापन करणार' या अहवालाला प्रतिसाद म्हणून, नेस्कोने त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक निवेदन प्रसिद्ध केले.

त्यात नेस्कोने म्हटले आहे की, “पूर्वीचे काही अहवाल, आमच्या भुमिका स्पष्टपणे चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. अशा प्रकारे सार्वजनिकरित्या नेस्को लिमिटेड कंपनीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंपनीची भूमिका, प्राणी कल्याणाबाबतच्या तिच्या जबाबदाऱ्या आणि समाजासाठी त्याचे मोठ्या प्रमाणावर योगदान यांचे चुकीचे चित्रण केले जात आहे.”

“पाल वेल्फेअर फाऊंडेशनने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या (bmc) अलीकडील संप्रेषणात असे दिसून आले आहे की, ते भटक्या कुत्र्यांच्या कल्याणाशी संबंधित कोणत्याही बाबींमध्ये नेस्कोला मध्ये ओढत नाही किंवा ते संबंधित गोष्टींचे पालन करण्यात त्यांचे कोणतेही अपयश दर्शवत नाही.

बीएमसीने लिहिलेल्या पत्रावर टिप्पणी करताना, नेस्कोने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “भटक्या कुत्र्यांना खायला घालण्याच्या उद्देशाने निवासी सोसायट्या काय करू शकतात याचे काही प्रमुख मुद्दे मांडलेले आहेत. यापैकी काहीही नेस्को लिमिटेडच्या मालकीच्या खाजगी मालमत्तेशी संबंधित नाही.”

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार

पालिकेच्या (bmc) पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ के.एल. पठाण म्हणाले, “भटक्या प्राण्यांना खायला घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रहिवासी सोसायट्या, व्यापारी संकुले आणि औद्योगिक क्षेत्रांसह सर्व भागात भटक्या प्राण्यांना खायला देण्याची परवानगी आहे.”



हेही वाचा

लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार?

ठाण्यातील SATIS-II प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा