Advertisement

नवी मुंबईत आज 'या' भागात पाणीपुरवठा बंद

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं असलं तरी गुरुवारीही...

नवी मुंबईत आज 'या' भागात पाणीपुरवठा बंद
SHARES

नवी मुंबई महानगरपालिकेनं आता पुन्हा एकदा येथील नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शहरात बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडी ने हाती घेण्यात आल्याने बुधवारी (8 जानेवारी) नवी मुंबई मधील सर्व प्रभागात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत पाणी पुरवठा होणार नाही.

यामुळे NMMC कार्यक्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली यासह अनेक प्रमुख क्षेत्रांवर परिणाम होईल, जेथे संपूर्ण कालावधीसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे थांबवला जाईल. याशिवाय सिडको परिसरातील कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही यावेळी बंद राहणार आहे.

शहरात गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुके नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. गुरुवारी पाणीपुरवठा कमी दाबानं सुरू झाल्यानंतर शुक्रवारी सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 



हेही वाचा

‘एचएमपीव्ही’ संसर्गासाठी ठाणे महापालिका सतर्क

फास्ट टॅगबाबत देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा