राज्यातील परिवहन विभागाने अलीकडे एक अधिसूचना जाहीर केली आहे. ज्यामध्ये एप्रिल 2019 च्या अगोदर विकल्या गेलेल्या तरी वापरात असणाऱ्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून 30 मार्च पूर्वी नंबर प्लेट बसवण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे.
परिपत्रकात म्हटलं की, 1 एप्रिल 2029 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात HSRP नंबर प्लेट 31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याच काम फारच कमी झालं आहे. त्यामुळं जुन्या वाहनांना ही HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 जून 2025पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
राज्यातील सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलंय. पण तरीही नागरिकांचा मात्र HSRP ही नंबर प्लेट बसवण्यास विरोध दिसतोय, कारण ही नंबर प्लेट बसवण्याचा सर्व खर्च नागरिकांना स्वतःच्या खिशातूनच करायचा आहे.
तसेच इतर राज्यांशी तुलना केल्यास महाराष्ट्रात मात्र हा खर्च जादा आहे. या कारणामुळेच नागरिकांमध्ये ही नंबर प्लेट बसवण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात नाराजी दिसतेय, यामुळेच आतापर्यंत अंदाजे फक्त 18 लाख गाड्यांनी HSRP बसवल्याचा अंदाज आहे.
किती पैसे भरावे लागणार?
- टू विलर : 450
- थ्री विलर : 500
- फोर विलर आणि इतर गाड्या : 745
हेही वाचा