आता लवकरच मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation-बीएमसी) दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या मीटरचे (water meter) रिडींग मोबाइल अॅप्लिकेशन (mobile application) ने करता येणार आहे. बीएमसी (bmc) यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन सुरू करणार आहे. हे अॅप आल्यानंतर नागरिक मोबाइल (mobile) वर मीटर रिडींग (Meter reading) करून ते स्वतःच बीएमसीला पाठवू शकतील. याशिवाय पाणी वापराचे अचूक रिडींग होण्यासाठी बीएमसी नवीन अल्ट्रासोनिक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटर बसवणार आहे.
यासाठी सर्वसामान्य नागरिक, पाणी कनेक्शन धारक, मीटर उत्पादक, परवानाधारक प्लंबर व सर्व संबंधितांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. सध्या बीएमसी (bmc) चे वॉटर मीटर इन्स्पेक्टर (Water meter inspector) स्वतः मीटर रीडिंग (Meter reading) घेतात. अपग्रेड केलेले मीटर बसविल्यानंतर मीटरवर बारकोड (Barcode) बसवले जातील. हा बारकोड स्कॅन करून आणि मीटर रीडिंग डिजिटल पद्धतीने करून ते रिडींग नागरिकांना बीएमसीला पाठवता येतील.
मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) बजेटनंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. नवीन मीटर (meter) आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील, जे अचूक मीटर रीडिंग (Meter reading) मिळविण्यात मदत करतील. नवीन मीटर बसविल्यानंतर मोबाइल अॅप्लिकेशन (mobile application) तयार केले जाणार आहे. मोबाइल अॅप्लिकेशनमुळे नागरिकांना त्यांचा पाण्याचा किती वापर होतो हे कळेल आणि ते मीटर रीडिंग बीएमसीला पाठवू शकतील. मुंबईत चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी बीएमसी आधुनिक मीटर यंत्रणा आणत आहे.
हेही वाचा -