चिराबाजार - येथील गझदर लेन भागात काही दिवसांपूर्वी गटाराचे बांधकाम करण्यात आले होते. त्यावेळी जुनी झाकणे काढून नवी झाकणे लावण्यात आली. मात्र हे करत असताना काढण्यात आलेली जुनी झाकणं तशीच रस्त्यावर पडून असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यावर पडून असलेली झाकणं उचलण्यात यावीत अशी मागणी स्थानिक करत आहेत. विशेष म्हणजे 2 आठवड्यापासून ही झाकणं अशीच पडून आहेत.
रस्त्यावर पडलेल्या या झाकणामुळे ट्रॅफिकची समस्या देखील निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी अब्दुल मकाणी यांनी दिली.
त्यामुळे आता पालिका प्रशासन कधी जागं होतंय आणि ही अशीच पडून असलेली झाकणं उचलतं असाच प्रश्न स्थानिकांना पडलाय.