रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने केलेल्या पाहणीत लोअर परळचा पूल धोकादायक आढळून आल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. २४ जुलैपासून ते दुरूस्ती पूर्ण होईपर्यंत हा पूल बंद राहणार आहे. परिणामी या पुलाचा नियमित वापर करणारे पादचारी आणि वाहनचालकांना त्रासात भर पडणार आहे. त्यामुळे पूल दुरूस्त होईपर्यंत प्रशासनाने पर्याय वाहतुकीची व्यवस्था करून दिली आहे.

'हे' आहेत पर्यायी मार्ग
- या पुलाशी जोडलेला महादेव पालव मार्ग म्हणजेच करी रोड रेल्वे स्थानकासमोरील पूल लालबागच्या दिशेने आणि ना. म. जोशी मार्ग हा चिंचपोकळीच्या दिशेने सुरू ठेवण्यात येणार आहे.
- फिनिक्स मॉल आणि कमला मिल कंपाऊंडसमोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला असेल.
- प्रभादेवी रेल्वे स्थानकापासून गणपतराव कदम मार्गे वरळी नाका हा मार्ग सुरू असेल
- लोअर परळ पुलाखाली असलेल्या भाजी मार्केटमधून पर्यायी मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
- लोअर परळ रेल्वे स्थानकात करी रोडहून जाण्यासाठी ना. म. जोशी पुलाखाली डाव्या बाजूला नव्याने सुरु केलेल्या पुलाचा वापर करता येईल.
हेही वाचा-
लोअर परळ पूल बंद, प्रवासी हैराण
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी नेमला तिसरा सल्लागार