गोरेगाव (goregaon) मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पामुळे एकूण 1,567 झाडे बाधित होणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai) केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, 6.5 किलोमीटर लांबीच्या भूमिगत दुहेरी बोगद्याचा मार्ग तयार होणार आहे. त्यासाठी झाडांची कत्तल करण्यात येणार आहे.
यापैकी, 513 झाडे पूर्णपणे तोडण्यासाठी चिन्हांकित केली आहेत. 581 झाडे प्रत्यारोपणासाठी नियुक्त केली गेली आहेत. तसेच वृक्ष प्राधिकरणाची अंतिम मंजुरी अद्याप बाकी आहे.
तोडण्यासाठी चिन्हांकित केलेली बहुतेक झाडे फिल्मसिटी गेटजवळ आरे कॉलनीच्या हद्दीत आहेत. तसेच प्रत्यारोपणासाठी नियुक्त केलेली झाडे महापालिका आरेमध्ये पुनर्रोपण करण्याची योजना आखत आहे.
हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खालून जाणार आहे. जीएमएलआर प्रकल्पाचा हा तिसरा टप्पा आहे. मुलुंडचे पूर्व उपनगर आणि गोरेगावच्या पश्चिमेकडील परिसर यांना जाेडण्याचे तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे.
हा बोगदा देशातील सर्वात रुंद बोगदा असणार आहे. ज्याचा व्यास 13 ते 14.39 मीटर असणार आहे. तसेच 1,567 बाधित झाडांपैकी 1,100 झाडांचे पुनर्रोपण करावे असा प्रस्ताव आहे.
महापालिकेने फिल्मसिटीच्या आतील 7,400-चौरस मीटर भूखंडावर अद्याप वृक्ष सर्वेक्षण केलेले नाही. जेथे TBM चे लॉन्चिंग शाफ्ट बांधले जाणार आहे. या भागातील उर्वरित बाधित झाडांच्या सर्वेक्षणाचे काम येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा