Advertisement

कलिनात जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया


कलिनात जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया
प्रतिकात्मक फोटो
SHARES

शुक्रवारी सकाळी कलिना परिसरात जलवाहिनी फुटली आणि हजारो लिटर पाणी वाया गेलं. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यानं ऐन सकाळी गर्दीच्या वेळेस वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. दरम्यान महापालिकेकडून या जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती करण्यात आली.


हजारो लिटर पाणी वाया 

कलिना परिसरात मेट्रोचं काम सुरू आहे. या कामादरम्यान जलवाहिनी फुटल्याचं म्हटलं जात आहे. राज्यात दुष्काळ पडला असून पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. असं असताना मुंबईत कलिना परिसरात मात्र जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे.


वाहतूककोंडी वाढली

जलवाहिनी फुटल्यानं या भागात पाणीच पाणी झालं. तर मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूककोंडी आणखी वाढली. त्यामुळे सकाळी सकाळी कामावर निघालेल्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे कलिना परिसरात कमी दाबाने पाणी सोडण्यात आलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा