मुंबईतील मानखुर्द परिसरात एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी भीषण असून, या आगीत संबंधित परिसरातील जवळपास डजनभर दुकान जाळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.
मानखुर्द परिसरात शुक्रवारी सकाळी प्लास्टिक कंपनीला आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २० गाड्या दाखल झाल्या आहेत. शिवाय, स्थानिक नागरिक व पोलीस आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत जीवितहानी झाल्याची माहिती अजून अस्पष्ट आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.