भारतमाता - येथील आयकर कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या बेकायदा स्टॉल्सवर महापालिकेने कारवाई केली. परंतु ,एक आठवडा उलटूनही स्टॉलचे सामान पथपथावरच पडून आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, रोगराईला आमंत्रण आणि पथपथावरून नागरिकांना चालण्याचे अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या वाढत जाणाऱ्या दुर्गंधीकडे पालिकेतील स्वछता विभागाने मात्र दुर्लक्ष केले आहे.