एकीकडे फळ-भाज्या, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा महागाईची झळ सोसावी लागणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत २.७१ रूपये, तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ५५.५० रुपयांनी वाढली अाहे.
रुपयाची झालेली घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या मूळ किंमतीतील वाढीमुळे गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. तसंच तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला दरांमध्ये बदल करत असतात. त्यांच्या या किंमती सरासरी बेंचमार्क व परदेशी व्यवहारांवर अवलंबून असतात. काही महिन्यांपूर्वी जीएसटीतील दरात बदल केल्यामुळे घरगुती विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यात विनाअनुदानित गॅस सिलेंडरमध्ये ४८ रुपयांची वाढ करण्यात असून आतापर्यंत विनाअनुदानित सिलेंडर जवळपास १०० रूपयांनी महागला आहे. रविवारपासून मुंबईकरांना प्रति गॅस (अनुदानित) सिलेंडरसाठी ४९४ रूपये मोजावे लागणार आहे.
महिना दर
एप्रिल ४८९ रूपये
मे ४८९ रुपये
जून ४९१ रूपये
हेही वाचा -
मेट्रो-४ लाही वादाचं ग्रहण, घाटकोपरवासियांचा विरोध
शाळाचं देणार विद्यार्थ्यांचे गणवेश