सीएसटी - राष्ट्रीय चर्मकार महासंघाने बुधवारी आझाद मैदानात निदर्शनं केली. वांद्रे उपजिल्हाधिकारी कार्यालयात 27 फेब्रुवारी रोजी एका एसआरए बांधकाम प्रकरणातल्या सुनावणी दरम्यान अॅड. आनंद सांगवीकर यांना अतिक्रमण विभागाच्या उपजिल्हाधिकरी स्वाती कारले यांनी अर्वाच्य भाषेचा वापर करत शिवीगाळ केली. या विरोधात स्वाती कारले यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना निलंबित करा अशी मागणी चर्मकार महासंघाने केली आहे. बुधवारी चर्मकार महासंघाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.