Advertisement

दिवाळी, छठपूजेसाठी रेल्वे विशेष गाड्या सोडणार

या निर्णयाचा कोटी प्रवाशांना फायदा होणार आहे.

दिवाळी, छठपूजेसाठी रेल्वे विशेष गाड्या सोडणार
SHARES

दिवाळी आणि छठ पूजेच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने (indian railway) शुक्रवारी विशेष गाड्या सोडण्याची आणि अतिरिक्त डबे जोडण्याची घोषणा केली आहे. गाड्यांमध्ये जनरल डबे वाढवण्यात येणार असून एकूण 12,500 डबे मंजूर करण्यात आले आहेत. याचा 1 कोटी प्रवाशांना फायदा होणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnav) यांनी सांगितले की, या सणासुदीच्या हंगामात 108 ट्रेनमध्ये जनरल डबे वाढवण्यात आले आहेत.

छठ पूजा आणि दिवाळी स्पेशल ट्रेनसाठी (special train) 12,500 डबे मंजूर करण्यात आले आहेत. 2023-24 मध्ये सणासुदीच्या काळात एकूण 4,429 विशेष गाड्या धावल्या, अशी माहिती एएनआयने दिली.

दरम्यान, गुरुवारी मध्य रेल्वेने मुंबई (mumbai) आणि जयपूर दरम्यान 27 आणि 28 सप्टेंबर रोजी सुपरफास्ट विशेष गाड्या चालवणार असल्याचे जाहीर केले. प्रवाशांच्या मागणीनुसार दिवाळी आणि छठपूजेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या ठाणे, वसई रोड, सुरत, वडोदरा, गोधरा, रतलाम, कोटा आणि सवाई माधवपूर स्थानकावर थांबतील.

एएनआयच्या अहवालानुसार, 24 सप्टेंबर रोजी अश्विनी वैष्णव यांनी राजस्थानमधील कवच 4.0 ची पाहणी केली होती. कवच 4.0 भारतात प्रथमच सवाई माधोपूर येथून सुरू झाले आहे. येत्या काही वर्षांत, कवचद्वारे 10 हजार लोकोमोटिव्ह दाखल केले जातील.


हेही वाचा

वांद्रे : स्विमिंग पूलसाठी 27 झाडांवर कुऱ्हाड

अबब! 2,931 झाडे लावण्यासाठी12 कोटी खर्च

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा