मस्जिद - इथल्या क्रॉफर्डमार्केट इथं सध्या रस्ता आणि गटार दुरुस्तीचं काम सुरू आहे. या कामामुळे ये-जा करताना नागरिकांना रोज अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे ही कामं दिवसा न करता रात्री करावी, किंवा इथं पडलेल्या डेब्रिजचा पसारा तरी कमी करावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.
अतीगर्दीच्या भागामध्ये रस्त्याचं काम रात्री करण्याची तरतूद असतानाही दिवसा काम का सुरू आहे. त्यामुळे ये-जा करताना नागरिकांना त्रास होत असल्यानं हे काम रात्री करा अशी मागणी पालिकेकडे केली आहे. यासंबंधी रहिवासी चांद उस्मान यांना विचारले असता येथे ठाण्यावरून आल्याचं सांगत त्यांना या कामांमुळे ये-जा करताना त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं.