कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांसोबतच नॉन कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचीही विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेह मिळण्यासाठी तब्बल 5 दिवसांनी परवानगी मिळाल्याने नातेवाईकांच्या ताब्यात कुजलेला मृतदेह मिळाला आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेत असलेले भाईंदर येथे राहणारे हरिश्चंद्र शंकरलाल जांगीर (45) सापडलेले हरिश्चंद्र जांगीर आपल्या गावी राजस्थानात जाण्यासाठी 14 मे रोजी मीरा-भाईंदरहून चालत वसईला निघाले. वसईवरून राजस्थानसाठी रेल्वे जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. पैसे नसल्याने जांगीर यांनी उपाशी पोटी भाईंदर ते वसई असा चालत प्रवास केला. वसईत पोहोचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईक जवळ नसल्याने हरिश्चंद्र जांगीर यांचा मृतदेह विरारमधील शीत शवागृहात ठेवण्यात आला होता.मात्र या शीतगृहाचे तापमान आवश्यकतेनुसार नसल्याने हरिश्चंद्र यांचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली
हरिश्चंद्र यांचे भाऊ जयप्रकाश जांगीर 17 मे रोजी विरार येथे पोहोचले. मात्र, महापालिकेने कोरोनाच्या चाचणीसाठी नमुने 2 दिवसांनी घेतले होते. अहवाल आल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जाऊ शकत नसल्याचे महापालिकेने सांगितलं. तसंच विरारमधेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सक्ती केली गेल्याचा आरोपही जयप्रकाश जांगीर यांनी केला आहे. मात्र, त्यांना आपल्या गावीच अंत्यसंस्कार करायचे असल्याने कोविड 19 तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेतली. तबब्ल 5 दिवसांनी त्यांना भावाचा मृतदेह ताब्यात मिळाला. मात्र, हा मृतदेह कुजलेला होता. मंगळवारी रुग्णवाहिकेने जयप्रकाश जांगीर हे आपल्या भावाचा कुजलेला मृतदेह घेऊन राजस्थानकडे रवाना झाले.
विरार पश्चिम येथे असलेल्या शव शीतगृहातील वातानुकूलित यंत्रणा नियमित काम करत नसल्याचं समोर आलं आहे. शव शीतगृहातील तापमान 5 ते 6 अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. मात्र तापमान 18 अंश सेल्सियस होते.
महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...
१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार