Advertisement

जेएनपीएच्या गेटवे बंदरात मिथेनॉल इंधनावर चालणारे पहिले जहाज

या जहाजाचे ‘अल्बर्ट मर्स्क’ असे नामकरण करण्यात आले आहे. 16 हजार कंटेनर वाहून नेणारे हे जहाज आहे.

जेएनपीएच्या गेटवे बंदरात मिथेनॉल इंधनावर चालणारे पहिले जहाज
SHARES

हरित इंधन (green fuel) म्हणून मिथेनॉलवर चालणारे जहाज जेएनपीएच्या गेटवे टर्मिनल (GTI) या बंदरात दाखल झाले आहे. या जहाजाचे ‘अल्बर्ट मर्स्क’ असे नामकरण करण्यात आले आहे. 16 हजार कंटेनर वाहून नेणारे हे जहाज आहे.

या कार्यक्रमाला जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल व केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे (raksha khadase) उपस्थित होत्या. जागतिक शिपिंग लाइन भारतात (india) असा कार्यक्रम आयोजित करण्याची ही पहिलीच घटना आहे.

यावेळी जेएनपीएचे (JNPA) अध्यक्ष उन्मेष शरद वाघ, मर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट क्लर्क, एपीएमचे मुख्यकार्यकारी अधिकारी कीथ स्वेंडसेन आदी उपस्थित होते.

जेएनपीए मधील गेटवे टर्मिनल्स इंडिया (मर्क्स) या खाजगी बंदरात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. अल्बर्ट मर्स्क हे 2024 - 25 मध्ये वितरित केल्या जाणाऱ्या 18 मोठ्या दुहेरी-इंधन मिथेनॉल जहाजांपैकी एक आहे.

दक्षिण कोरियाच्या उल्सान येथे ह्युंदाई हेवी इंडस्ट्रीजने बांधलेले हे जहाज आहे. 2040 पर्यंत निव्वळ-शून्य ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनापर्यंत पोहोचण्याच्या मर्क्सच्या धोरणात हा दुहेरी-इंधन फ्लीट महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

जैव आणि ई-स्रोतांमधून मिळविलेले मिथेनॉल हे बंकर ऑइल सारख्या पारंपारिक जीवाश्म इंधनाच्या तुलनेत उत्सर्जन कमीत कमी 65 टक्के कमी करू शकणार आहे. जागतिक शिपिंग उद्योगातील भारताची भूमिका सागरी व्यापारातील वाढत्या महत्त्वाला या ऐतिहासिक घटनेमुळे अधिक बळकटी मिळाली आहे.

बंदराची क्षमता आणि शाश्वत सागरी वाहतुकीत टप्पा हा एक महत्वाचा टप्पा असलेली घटना यामुळे जेएनपीए मध्ये झाली असल्याचा दावा जेएनपीए ने केला आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा