Advertisement

कांदिवलीत बँकेच्या शौचालयात आढळला ढुरक्या घोणस

कांदिवली पूर्वेकडील एका बॅंकेच्या शौचालयात 'ढुरक्या घोणस' प्रजाती साप आढळल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हा साप आढळला.

कांदिवलीत बँकेच्या शौचालयात आढळला ढुरक्या घोणस
SHARES

कांदिवली पूर्वेकडील एका बॅंकेच्या शौचालयात 'ढुरक्या घोणस' प्रजाती साप आढळल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हा साप आढळला. मात्र, बॅंकेच्या शौचालयात कर्मचाऱ्यांना साप दिसल्यामुळं कार्यालयात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यावेळी बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी सर्प संस्थेला सापाची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच सर्प संस्थेच्या सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून सापाला ताब्यात घेतलं.


अडीच फुटांचा साप

बॅंकेच्या शौचालयात आढळलेला ढुरक्या घोणस साप हा अडीच फुटांचा होता. बँकेला सलग तीन दिवससुट्टी असल्यामुळं हा साप शौचालयात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, बँकेच्या शौचालयाची खिडकी बंद होती. त्यामुळं हा साप आत कसा आला, याबाबत तपासणी केली जात आहे. 


जमिनीच्या आत राहणारा साप

ढुरक्या घोणस हा साप जमिनीच्या आतमध्ये राहतो. तो सहसा जमिनीवर दिसून येत नाही. दरम्यान, घटनास्थळी पोहोचून सर्प संस्थेनं त्या सापाला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडलं.



हेही वाचा -

राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी यांना १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा