स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली दूधकोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने पश्चिम रेल्वेची मदत घेण्याचं ठरवलं आहे. मुंबईतील दुधाचा प्रश्न तीव्र होऊ नये यासाठी राज्य सरकार सध्या वेगवेगळी शक्कल लढवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुजरातमधून ५९४४० अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पॅसेंजरच्या वाघिणी (वॅगन) मधून दूध आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पश्चिम रेल्वेने देखील परवानगी दिली आहे.
राज्य सरकारने मुंबई-अहमदाबाद मार्गे गुजरातमधून २५ टँकरच्या माध्यमातून दूध मुंबईत आणण्याचा केलेला प्रयत्न सकाळी आंदोलनकर्त्यांनी हाणून पाडला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी स्वत: रस्त्यावर उतरून हे टँकर अडवले. यामुळे मागील २ दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आणखीनच चिघळलं आहे.
महाराष्ट्र में दूध की आपूर्ति रोकने संबंधी आंदोलन के मद्देनज़र आम जनता की सुविधा के लिए पश्चिम रेलवे द्वारा 59440 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पैसेंजर से अगले कुछ दिनों में मुंबई के लिए 44000 लीटर क्षमता प्रत्येक के 12 मिल्क कंटेनर लाने की विशेष अनुमति दी गई है। pic.twitter.com/BNgqZTdDTV
— Western Railway (@WesternRly) July 17, 2018
या पॅसेंजर ट्रेनला प्रत्येकी ४४ हजार लिटर क्षमतेचे कंटेनर जोडण्यात येतील. असे एकूण १२ कंटेनर या ट्रेनला जोडून गुजरातमधून मुंबईत दूध आणण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतल्याचं पश्चिम रेल्वेने ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.
हेही वाचा-
दुधाच्या टँकरला पोलिसांचं संरक्षण
दूधकाेंडी आंदोलन गुजरातच्या सीमेवर, २५ टँकर अडवले