Advertisement

मुंबई ते JNPA प्रवास आता 35 ते 40 मिनिटांत होणार

शिवाय हा प्रवास अधिक सुरक्षित असणार आहे.

मुंबई ते JNPA प्रवास आता 35 ते 40 मिनिटांत होणार
SHARES

जेएनपीए (JNPA) ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंतचा प्रवास आता जलद होणार आहे. लवकरच स्पीड बोटींची ट्रायल घेण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रवासी वाहतूक करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला जाणार आहे. या स्पीड बोटींमुळे प्रवाशांना जेएनपीए-मुंबईपर्यंतचा प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटांत करता येणे शक्य होणार आहे. शिवाय हा प्रवास अधिक सुरक्षित असणार आहे.

प्रवासी संख्या कमी झाल्याने आणि लाकडी बोटी सुरक्षित नसल्यामुळे जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी प्रवासासाठी नवीन पर्याय सुचवला होता.

प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटरीवर चालतील अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या स्पीड बोटींचा वापर करावा. या बोटींमध्ये सोयी-सुविधांनी सुसज्ज असतील,असं उन्मेष वाघ म्हणालेत. स्पीड बोटीच्या प्रकल्प प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात यावा, यासाठी जेएनपीए प्रशासनाने काही महिन्यांपासून तयारी सुरू केली होती.

यासाठी इलेक्ट्रॉनिक बॅटरींवर चालणाऱ्या प्रदूषणविरहित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दोन फायबरच्या हलक्या स्पीड बोटी 10 वर्षाच्या कालावधीसाठी पुरवठा करण्याचा प्रस्ताव जेएनपीए प्रशासनाने तयार केला होता. दरम्यान या इलेक्ट्रॉनिक बॅटरीवर चालणाऱ्या प्रदुषणविरहित असणार आहेत.

असा आहे प्रोजेक्ट

माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला बोटी पुरवठा आणि हाताळणीचे काम देण्यात आलंय.

10 वर्षांसाठी जेएनपीएने 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 रुपयांच्या खर्चाची तरतूदही करण्यात आलीय आहे.

उन्हाळी हंगामात 20-25 प्रवासी व पावसाळी हंगामात 10-12 क्षमतेच्या दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

दोन स्पीड बोटी गेल्या फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच वाहतुकीसाठी जेएनपीटीच्या सेवेत दाखल होणार होत्या.

तांत्रिक कारणांमुळे स्पीड बोट सेवा सुरू करण्यात आलीय.

सागरी स्पीड बोट सेवेमुळे बंदरात कामकाजासाठी मुंबईतून ये-जा करणाऱ्या या सेवेचा फायदा होणार आहे. जेएनपीएचे कामगार, प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ आणि फॅमिली मेंबर्स, पोर्ट युजर्स, कामगारांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. यामुळे वेळही वाचण्यास मदत होणार आहे.



हेही वाचा

मुंबई विमानतळावर प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा सुरू होणार

मुंबईत लवकरच उबेरची पेट कॅब सेवा सुरू होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा