Advertisement

वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, 9 जण जखमी

जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे.

वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, 9 जण जखमी
SHARES

वांद्रे टर्मिनस येथे आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची  घटना घडली असून, त्यात 9 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे.

वांद्रे टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे गोरखपूर एक्सप्रेस आली असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडे पाचच्या सुमारास वांद्रे टर्मिनस येथे ही घटना घडली. येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणाऱ्या गोरखपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी जमले होते.

दरम्यान, ही ट्रेन आली असताना ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली, असं सांगण्यात येत आहे. या घटनेत ९ प्रवासी जखमी झाले आहेत. तर त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी ७ जणांची प्रकृती स्थिर आहे. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिीत मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.  



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा