Advertisement

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड फ्लायओव्हरचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

2012 मध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (MMRDA) द्वारे बांधण्यात आले, केवळ 12 वर्षांनंतर ऑडिटची आवश्यकता गंभीर चिंता निर्माण करते.

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड फ्लायओव्हरचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार
SHARES

महापलिकेने (bmc) वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI)ला सांताक्रूझ (santacruz) -चेंबूर (chembur) लिंक रोडवरील (SCLR) तीन उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम दिले आहे. 2012 मध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (mmrda) द्वारे हे उड्डाणपूल बांधण्यात आले. 

मात्र केवळ 12 वर्षांनंतर ऑडिट करावे लागणे हे चिंतेची बाब आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या (flyover) टिकाऊपणा आणि देखभालीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एससीएलआर (SCLR) हा मुंबईतील 6.45 किलोमीटर लांब आणि 45.7 मीटर रुंद रस्ता आहे. जो सांताक्रूझमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला (western express highway) चेंबूरमधील इस्टर्न एक्सप्रेस हायवे (eastern express highway) सोबत  जोडतो. 

हा सहा पदरी रस्ता मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP)चा एक भाग म्हणून तयार करण्यात आला होता. ज्यासाठी 454 कोटी रुपयांचा खर्च आला होता. बांधकामाच्या नंतरच्या टप्प्याला एमएमआरडीए (mmrda) ने स्वतःच्या संसाधनांचा वापर करून पुर्ण केले होते. 2015 मध्ये, एमएमआरडीएने एससीएलआरचे व्यवस्थापन महापालिकेकडे हस्तांतरित केले.

यामध्ये अमर महल, कुर्ला कलिना आणि डबल डेकर फ्लायओव्हर अशा तीन प्रमुख उड्डाणपुलांचा समावेश आहे. आजपर्यंत या उड्डाणपुलांची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. 2021 मध्ये महापालिका आणि रेल्वे प्राधिकरणाने तपासणी केली. या तपासणीत लिंक रोड आणि फ्लायओव्हर्स या दोन्हींच्या दुरुस्तीची गरज असल्याचे समोर आले. 

त्यामुळे महापालिकेने या महत्त्वपूर्ण कामासाठी व्हीजेटीआयची नियुक्ती केली आहे. ज्यांची फी 33 लाख रुपये आहे. यातील तीन उड्डाणपुलांपैकी, 3.45 किमीचा सीएसटी रोड उड्डाणपूल सर्वात महत्त्वाचा आहे. याव्यतिरिक्त, मार्गामध्ये एलबीएस रोडवरील 560 मीटरचा कुर्ला कलिना उड्डाणपूल आणि 1.8 किमीचा डबल डेकर उड्डाणपूल समाविष्ट आहे.

सुत्रांनुसार, अलीकडील तपासणीत तुटलेले युपीव्हीसी पाईप्स, खराब झालेले गर्डर्स, वाढलेली झाडे आणि फुटपाथ यासह अनेक समस्या आढळल्या. म्हणून पालिकेने उड्डाणपुलांचे तपशीलवार स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बांधकाम विभागातील एका पालिका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सामान्यत: त्यांच्या बांधकामानंतर 25 वर्षांनी केले जाते. मात्र, हे उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 12 वर्षांनी त्यांचे ऑडिट करण्याची गरज भासली आहे.

याव्यतिरिक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या आणि नंतर एमएमआरडीएकडे हस्तांतरित केलेल्या अंधेरीतील आणखी एका पुलालाही मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता आहे, ज्यामुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे. 



 हेही वाचा

कांदिवली : प्लॅटफॉर्म 4 वरील फूट ओव्हर ब्रिज तोडण्याची शक्यता

पंचकलशी पाककलेवर आधारित 'सोल फूड' पुस्तकाचे अनावरण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा