Advertisement

परीक्षा देऊन परतताना विद्यार्थी खड्यात पडून जखमी, पालिकेचा निष्काळजी पणा

या अपघातामुळे विवेकला दहावीच्या परीक्षेलादेखील मुकावे लागले आहे. त्याचा डोळाही निकामी होण्याची शक्यता आहे.

परीक्षा देऊन परतताना विद्यार्थी खड्यात पडून जखमी, पालिकेचा निष्काळजी पणा
SHARES

पावसाळ्याची पूर्व तयारी म्हणून पालिकेकडून मुंबईत ठिक ठिकाणी रस्ते आणि ड्रनेज लाईनची कामे हाती घेतली आहेत. घाटकोपरमध्ये अशाच काम सुरू असलेल्या मलनिस्सारण खड्यातपडून गंभीर जखमी झाला आहे. विवेक घडशी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. पालिकेने कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराच्या निष्काळजी पणामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

 हेही वाचाः- रंगाचा बेरंग झाल्यास महिनाभर तुरुंगात जाल

घाटकोपर पश्चिम येथे पालिकेच्या वॉर्ड क्र. १२७ मध्ये स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील यांच्या प्रयत्नातून गणेश नगर ते कातोडी पाडा, असे मलनिस्सारण वाहिकेचे काम केले जात होते. त्यासाठी कंत्राटदारामार्फत खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्याच्या बाजूला नियमाप्रमाणे बॅरिकेड्स लावावे लागतात. मात्र, कंत्राटदाराने बॅरिकेड्स लावले नाही. दरम्यान, दहावीची परीक्षा देऊन विवेक घडशी हा विद्यार्थ्यी सायकलवरून या परिसरातून जात होता. खड्ड्याजवळून जाताच विवेक याचा तोल गेला व तो खड्ड्यात पडला आणि त्या ठिकाणी असलेली सळी त्याच्या डोळ्यात घुसली. 

  हेही वाचाः- सीबीआयकडून राणा कपूरांच्या मुलींच्या कार्यालयावर धाडसत्र

या अपघातामुळे त्याच्या चेहऱ्यावरही खोलवर जखमा झाल्या आहेत. त्याला पालिकेच्या केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे विवेकला दहावीच्या परीक्षेलादेखील मुकावे लागले आहे. त्याचा डोळाही निकामी होण्याची शक्यता आहे. पालिकेचे आयुक्त अशा बेजबाबदार पालिका अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा