मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा केंद्र सरकारला सुनावलं आहे. मुंबईतील खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी दर्शवत केंद्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केली.
दिल्लीतील सिलिंग प्रकरणाची सुनावणी नुकतीच न्या. मदन लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्तींनी दिल्लीत साचणारं पाणी आणि मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून त्यांना जाब विचारला.
दिल्लीतील मिंटो रोडवरील एक बस पावसाच्या पाण्यात बुडाली होती. तर दुसरीकडे मुंबईतील खड्ड्यांत पडून रहिवासी मृत्यूमुखी पडत आहेत. देशात नेमकं काय सुरू आहे? ही कसली झोप आहे? जरा रस्त्यावर उतरून बघा, रहिवासी काय सहन करत आहेत.
एवढंच नव्हे, तर न्यायालयाने स्थानिक प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचीही याप्रकरणी खरडपट्टी काढली.
हेही वाचा-
कल्याणनंतर नवी मुंबईतही खड्ड्याचा बळी
व्हाॅट्सअॅपवर नजर की नजरकैद? सुप्रीम कोर्ट केंद्र सरकावर संतापलं