BMC मालाडमधील 800-मीटर लांबीच्या मिठ चौकी टी-आकाराचा उड्डाणपुल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खुला होण्याची शक्यता आहे.
मालाडमधील 800 मीटर लांबीच्या मिठ चौकी टी-आकाराच्या उड्डाणपुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्याची BMC योजना आखत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा उड्डाणपूल पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील, अशी पुष्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली असून, उड्डाणपूल वाहनांसाठी खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय मंत्री आणि मुंबई उत्तरचे खासदार पीयूष गोयल यांनी प्रकल्पाला भेट देऊन काम किती झाल्याची पाहणी केली. 6 ऑक्टोबर रोजी उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणाऱ्या गोयल यांनी सुरू असलेल्या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त केले.
वाहतूक नियंत्रणात मदत होईल
गजबजलेल्या मिठचौकी जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला उड्डाणपूल या वर्षाच्या सुरुवातीला अंशत: खुला करण्यात आला. मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारी पूर्व-पश्चिम शाखा आधीच कार्यरत आहे. तर दुसऱ्या शाखेचे काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
800 मीटर पसरलेल्या आणि 55 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या, टी-आकाराच्या उड्डाणपुलाच्या पूर्व आणि दक्षिण दिशांना दोन शाखा आहेत. एकदा पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर, ट्राफिक कमी होण्यास मदत होईल. तसेच प्रवासाचा वेळ देखील कमी होईल.
मार्वे ते मालाड आणि गोरेगाव प्रवास करणाऱ्या वाहनांचा सध्याचा 20-30 मिनिटांचा प्रवास काही मिनिटांमध्ये पूर्ण होईल.
हेही वाचा