Advertisement

दररोज ५० वाहनांवर कारवाई करा अन्यथा कारवाईला सामोरं जा; वाहतूक पोलिसांना वरिष्ठांचे आदेश


दररोज ५० वाहनांवर कारवाई करा अन्यथा कारवाईला सामोरं जा; वाहतूक पोलिसांना वरिष्ठांचे आदेश
SHARES

वाहतुकीच्या नियमांच उल्लंघन करणाऱ्या अनेक दुचाकीस्वार व कार मालकांवर कारवाई करण्यात येते. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या नियमांच उल्लंघन होत आहे. त्यामुळं आता दररोज वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई करा अन्यथा कारवाईची मशीन आणि वॉकीटॉकी जमा करणार नाही असे निर्देश वाहतूक पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतुकीला बंदी होती. जून महिन्यापासून वाहतूक निर्बंध शिथिल करण्यात आलं आहे. तसंच दुकानं, कार्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं अनेक वाहनचालक रस्त्यावर येत आहेत. पण वाहतूक नियमांकडं दुर्लक्ष करत आहेत.

हेल्मेट न घालणे, वेगात वाहन चालविणे, सिग्नल ओलांडणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्या वाहनांवर ई-चलन आकारले जाते, तर मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीला परवानगी नाही रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेरच्या गाड्या दिवसभरासाठी जप्त करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांना दररोज वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या २५ ते ५० वाहनांना ई-चलन आकारण्यास सांगितले आहे. तसंच, ५ ते १० रिक्षा-टॅक्सी जमा करून त्या दिवसभरासाठी ताब्यात घेण्यास सांगितले आहे. दरम्यान रिक्षा-टॅक्सी जमा केल्या जातात. एका मिनिटात येणाऱ्या ५ ते ६ रिक्षा ठेवायच्या कुठं, असा सवाल वाहतूक पोलीस विचारत आहेत.



हेही वाचा -

पावसात अडकल्यास मुंबई पालिकेचं 'हे' अ‍ॅप ठरणार संकटमोचक

मुंबईतील 'या' वॉर्डांमधील कोरोना रूग्णांची संख्या अनेक राज्यांपेक्षा अधिक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा