ठाणे शहरातील खड्ड्यांनी अातापर्यंतचा ५ ते ६ जणांचा बळी घेतला अाहे. मात्र, तरीही ठाणे महापालिका अाणि इतर शासकीय यंत्रणांचा याचं काहीच सोयरसुतक नाही. त्यामुळे अाता ठाणेकरांची सरकारला धारेवर धरलं अाहे. मतदानाच्या माध्यमातून सरकारला धडा शिकवण्यासाठी ठाणेकरांनी 'नो रोड नो वोट' मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून शुक्रवारी दुपारी ठाण्यातील जानकी देवी नगर इथं या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजवून चांगला रस्ता तयार करावा अशी मागणी करत शोकसभाही अायोजीत केली होती. यामध्ये ३०० ते ४०० नागरिकांनी सहभाग घेतला होता. चांगला रस्ता न दिल्यास मतदानही नाही, असा निर्धार यावेळी नागरिकांनी केला.
ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होते. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी फाऊंडेशनने वाहतूक पोलिसांकडे केली अाहे. तसंच येत्या काही दिवसात फाऊंडेशनच्या वतीने कार रॅली देखील काढली जाणार आहे. ही रॅली वाघबिळ नाका घोडबंदर रोडपासून ते आनंद नगर टोल नाकापर्यंत काढण्यात येणार आहे.
खड्ड्यांपासून ठाणेकरांची मुक्तता व्हावी, यासाठी ठाणे सिटिझन्स फाऊंडेशननं महापालिका, पोलिस आणि पीड्ब्ल्यूडी यांना पत्र पाठवलं आहे. यामध्ये लवकरात लवकर खड्डे बुजवून चांगला रस्ता तयार करावा, अशी मागणी केली आहे.
- कासबर ऑगस्टिन, अध्यक्ष, ठाणे सिटिझन्स फाऊंडेशन
हेही वाचा -
पालकांना 'ब्लू व्हेल' नंतर 'मोमो' गेमची धास्ती!
मेट्रो ३ ची रात्रपाळी पुन्हा सुरू; उच्च न्यायालयाची परवानगी