कोविड 19 च्या लसीकरणाला भारतामध्ये १६ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता तयारीला सुरुवात झाली आहे. आज मुंबई मध्ये पुण्याहून कोविशील्ड लसीच्या डोस ची पहिली बॅच दाखल झाली आहे. दरम्यान बीएमसी च्या विशेष गाडीने या लसीचे डोस मुंबई मध्ये आणण्यात आले आहेत. सीरम इंस्टिट्युटकडून आता लसीच्या वितरणाला सुरूवात झाली आहे. काल त्यांनी १३ शहरांमध्ये लस पाठवायला सुरूवात केल्यानंतर याबाबत आनंद व्यक्त केला होता.
हेही वाचाः- सीरम लसीचा साठा वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना, महाराष्ट्राला मिळाले ९ लाख ६३ हजार कोरोना डोसेस
बीएमसीकडे सध्या कोविशिल्ड लसीच्या १,३९,५०० डोसेसचा साठा आहे. मुंबईत ही कोविशिल्ड लस सध्या एफ साऊथ विभागात परळ मध्ये ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी यामधून लसी केंद्रावर पोहचवल्या जाणार आहेत. मुंबईत ७२बुथ आहे. परळ हे मुंबईतील मध्यावर्ती ठिकाण आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात लस साठवून ठेवण्याची यंत्रणा मुंबई पालिकेने सज्ज ठेवली आहे. नुकतीच लसीकरणासाठी ड्राय रन घेण्यात आली आहे. मुंबईमध्ये १४ हजार जणांना एका दिवशी लस देण्याची क्षमता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्धे यांना लस दिली जाणार आहे. नंतर टप्प्याटप्याने इतरांना दिली जाणार आहे. त्यासाठी को विन सिस्टमचा वापर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्धे यांना लस दिली जाणार आहे. नंतर टप्प्याटप्याने इतरांना दिली जाणार आहे. त्यासाठी को विन सिस्टमचा वापर केला जाणार आहे.