Advertisement

लॉकडाऊनमुळं टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ

देशभरातील लॉकडाऊनच्या परिस्थिती छोट्या पडद्यासाठी पर्वणी ठरली आहे.

लॉकडाऊनमुळं टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ
SHARES

देशभरातील लॉकडाऊनच्या परिस्थिती छोट्या पडद्यासाठी पर्वणी ठरली आहे. बार्क आणि नेल्सन यांनी सादर केलेल्या अहवालातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. बाहेर जाण्यावर र्निबध आल्यानं घरातच अडकून पडलेल्या मंडळींचं टीव्ही पाहण्याचं प्रमाण ६ टक्क्यांनी वाढलं आहे. तर सरासरी टीव्ही पाहण्याची जी कालमर्यादा आहे, त्यातही प्रत्येक व्यक्तीमागे २ टक्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) आणि नेल्सन यांनी संयुक्तरित्या अहवाल प्रकाशित केला असून, यामध्ये कोरोनामुळं छोट्या पडद्याचे जे प्रेक्षक आहेत. त्यांच्यावर नेमका कशाप्रकारे परिणाम झाला आहे हे अभ्यासण्यात आले आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांतील प्रेक्षकसंख्या आणि देशभरात लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झाल्यानंतरची प्रेक्षकसंख्या यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळं टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येत जास्त वाढ झाली आहे. सर्वाधिक प्रमाण हे वृत्तवाहिनी पाहणाऱ्या प्रेक्षकांचं आहे. वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत ८ टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांमध्ये वृत्तवाहिन्या आघाडीवर आहेत. वृत्तवाहिन्यांची प्रेक्षकसंख्या ५७ टक्के  इतकी आहे. त्याच्यानंतर लहान मुलांच्या वाहिन्यांना वाढता प्रतिसाद मिळत असून त्यांची प्रेक्षकसंख्या ३३ टक्के इतकी आहे. 

चित्रपट वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत १४ टक्के  इतकी वाढ झाली आहे.  जीईसी अर्थात मनोरंजन वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत केवळ एक टक्काच वाढ झाली आहे. याचाच अर्थ हिंदी-मराठी मनोरंजन वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग फारसा वाढलेला नाही. सध्या टीव्ही पाहण्याचे प्रमाण हे प्राइम टाइम नसलेल्या वेळेत जास्त आहे. सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत टीव्ही जास्त पाहिला जातो, असे हा अहवाल सांगतो. मराठीतही वृत्तवाहिन्या पाहण्याच्या वेळेत झालेली वाढ ही १०१ टक्के इतकी आहे.

लॉकडाऊनच्या काळात वाढणारी प्रेक्षकसंख्या लक्षात घेता छोटय़ा पडद्यावरच्या जाहिरातींच्या संख्येतही आधीपेक्षा वाढ झालेली दिसून आली आहे. जाहिरातींचे प्रमाण आधीपेक्षा १३ टक्क्यांनी वाढले असून यात सामाजिक जाहिरातींचा वाटा मोठा आहे.  पाठोपाठ बँकिं ग-अर्थविषयक जाहिराती ४७ टक्के  तर खाद्यपदार्थ आणि संबंधित जाहिरातींचे प्रमाण ३६ टक्के  इतके  आहे.



हेही वाचा -

रेल्वेकडून गरजूंना खाद्यपदार्थाच्या पाकिटांचं वाटप

आता ‘झोमॅटो’द्वारे घरपोच मिळणार किराणा सामान



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा