राज्यात आठवडाभरात पाऊस सक्रीय झाला खरा, मात्र अजूनही अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. राज्यात 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला आहे. मात्र, मुंबईसह ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग करत आहे.
तर मुंबई - गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे. तर शहापूर तालुक्यातील खर्डी इथल्या काष्टी आणि वैतागवाडी गावांचा पर्यायी रस्ता वाहून गेला आहे.
पावसाने निवळी ते हातखंबा दरम्यान महामार्गाचा भाग खचला आहे. त्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक संथ सुरू आहे. याआधी मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, येथे जोरदार पाऊस झाला तर दरड खाली येण्याची भीती कायम आहे.
पावसात शहापूर तालुक्यातील खर्डी इथल्या काष्टी आणि वैतागवाडी गावांचा पर्यायी रस्ता वाहून गेलाय. या गावात समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे. त्यामुळे गावात जाण्यासाठी पर्यायी रस्ता बांधण्यात आलाय. मात्र पावसानं या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य आहे. त्यात काल झालेल्या पावसात रस्त्याचा एक भाग वाहून गेल्यानं गावकरी तसेच विद्यार्थ्यांना जेसीबीतून रस्ता ओलांडावा लागत आहे.
हेही वाचा