Advertisement

पालिका कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा गटविमा योजना ?


पालिका कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा गटविमा योजना ?
SHARES

 मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली गटविमा योजना बंद करण्यात आल्यानंतर आता ही योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता अाहे. गटविम्यासाठी पालिकेकडून निविदा मागविण्यात आल्या आहे. गटविमा योजना बंद करण्यात आल्यामुळं कामगार, कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांमध्ये ही योजना पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


कंपनी काळ्या यादीत

मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह २०११ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांकरता १ ऑगस्ट २०१५ पासून वैद्यकीय गटविमा योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी युनायटेड इन्शुरन्स कंपनीबरोबरच ३ वर्षांचा करारही करण्यात आला. परंतु दोन वर्षे ही योजना यशस्वीपणे राबवल्यानंतर तिसऱ्या वर्षी या कंपनीने पालिकेने देऊ केलेल्या ११६. २० कोटींच्या तुलनेत १४१.७६ कोटींची मागणी केली. मात्र, जीएसटीसह ही रक्कम १६७ कोटींच्या घरात गेली. परंतू या कंपनीशी वाटाघाटी करून तसेच तडजोड केल्यानंतरही मार्ग न निघाल्याने या कंपनीला नोटीस दाखवून महापालिकेने का कंपनीला काळ्या यादीत टाकले.


जाहिरात प्रकाशित 

 मागील १ सप्टेंबर २०१७ पासून ही योजना बंद असून या योजनेच्या आधारे अनेकांनी वैद्यकीय उपचार तसेच शस्त्रक्रिया केल्या आहेत. परंतू,  या सर्वांचे वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचे दावे रखडले असून त्यांना याचा अद्यापही लाभ मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आणि सपाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समिती हा मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाला ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानुसार अखेर सर्व प्रकारच्या परवानगी प्राप्त झाल्यानंतर याच्या निविदा मागवण्यात येत असून याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.



हेही वाचा -

प्लास्टिक बंदी : रविवारी ५९२ किलो प्लास्टिक जप्त

ज्येष्ठांना पालिका रुग्णालयात संपूर्ण मोफत उपचार


 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा