तिकीट तपासकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या 3 दिवसानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रवाशाने तपासकाला मारहाण केल्याबद्दल लेखी माफी देखील मागितली होती. पण 3 दिवसांनी बोरिवली (borivali) रेल्वे पोलिसांनी कॉन्स्टेबलच्या अहवालावर आधारित त्याच्यावर आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे, प्रवासी तिकीट तपासक (TTE) नवाजसबीर सिंग ज्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांनी अनिकेत भोसले आणि अन्य एका प्रवाशाविरुद्ध (नाव लपवून ठेवलेले) तक्रार दाखल करण्यास नकार दिला. कारण भोसले यांनी माफी मागितली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
15 ऑगस्ट रोजी सिंग चर्चगेट (churchgate) -विरार (virar) जलद वातानुकूलित (AC) लोकलमध्ये असताना ही घटना घडली.
फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना त्यांनी पकडले त्यामुळे त्याने त्यांना दंड भरण्यास सांगितले. मात्र, भोसले आणि अन्य एका प्रवाशाने सिंग यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली, जी हाणामारीपर्यंत (fight) गेली.
“भोसले यांनी सिंग यांना शिवीगाळ केला आणि त्यांचा शर्ट फाडून त्यांच्यावर हल्ला केला. यामुळे त्यांचे 1,500 रुपयांचे नुकसान झाले,” असे रेल्वे अधिकारी म्हणाले.
जेव्हा ट्रेन बोरिवलीला पोहोचली तेव्हा दोन रेल्वे कॉन्स्टेबलना डब्यात पाठवण्यात आले आणि सिंग आणि आरोपी दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसून आले.
“भोसलेने नंतर आपली चूक कबूल केली. तसेच सिंग यांना 1,500 रुपये परत केले आणि अधिकाऱ्यांना लेखी माफी मागितली.” असे अधिकाऱ्याने सांगितले.
त्यावेळी अधिकाऱ्यांनी भोसले यांना इशारा देऊन जाऊ दिले होते. 18 ऑगस्ट रोजी या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा